द जनसत्ता न्यूज
माती परीक्षण करणे ही काळाची गरज असून एकरी शंभर टन उत्पादन घेण्यासाठी महत्त्वाचे आहे असे मत ऊस तज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
ते अग्रण धुळगाव (तालुका कवठेमहांकाळ) येथील कृषी विभाग अंतर्गत माजी वसुंधरा पाच शून्य अंतर्गत पंचायत समिती ,जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी रमेश वंडाळे भंडारे उपस्थित होते .
यावेळी डॉ. शांतीकुमार पाटील म्हणाले की १०० टन उत्पादन घेण्यासाठी कोण कोणते उपाय करायचे ,त्याचे पद्धत, त्याचे लागण ,खते ,सेंद्रिय खते आदी विषयी सखोल चर्चा विषयी माहिती दिली. पाचट व्यवस्थापन करणे हे काळाची गरज असून धुरमुक्त गाव अभिमान राबवावा असे आव्हान करण्यात आले .
यावेळी या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे ,कृषी सहायक गजानन अजेटराव ,ग्रामपंचायत अधिकारी अंकुश डवणे ,उपसरपंच भारती चौगुले ,सरपंच शिवदास भोसले, रमेश खंडागळे ,राजकुमार पाटील कृषी पर्यवेक्षक,पंचायत समितीचे कृषी अधिकारी चंद्रकांत माळी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नागेश कोरे, विस्तार अधिकारी सुनील कातळकर, गावातील ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते .
आभार शिवश्री रमेश खंडागळे यांनी मानले.
अग्रण धुळगाव (तालुका कवठेमहांकाळ) येथील ऊस मेळाव्यात बोलताना डॉ. शांतीकुमार पाटील.