द जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ
जगात ४१ देशात, देशात नंबर १ लढा पत्रकार आणि पत्रकारितेसाठी फक्त आणि फक्त पत्रकारांसाठी काम करणारी ४७ देशात कार्यरत असुन एकूण सदस्य संख्या ३ लाख ७० हजारांहून अधिक असणारी व्हॉईस ऑफ मीडिया सांगली जिल्हा पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडीद्वारे नुकतीच मिरज येथील माधवजी मंदिर किल्ला भाग मिरज येथे बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी पार पडली. या निवड प्रक्रियेमध्ये कवठेमहांकाचे पत्रकार दैनिक जनमतचे कवठेमहांकाळ तालुका प्रतिनिधी तानाजी शिंगाडे यांची डिजिटल मिडीया सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी व कवठेमहांकाळ तालुका कार्यकारिणी यांच्या मान्यतेने हि निवड करण्यात आली.
यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत कुकडे, जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतिब,व डिजिटल मिडीया महाराष्ट्र राज्य संघटक दिपक ढवळे, कार्याध्यक्ष गणेश आवळे,टि व्ही ९ चे जिल्हा प्रतिनिधी व इलेक्ट्रॉनिक मिडिया सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या हस्ते या निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.