yuva MAharashtra शालेय विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषा व आठवडी बाजार.

शालेय विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषा व आठवडी बाजार.

Admin
0




द जनसत्ता न्यूज 

माडग्याळ / विजय चौगुले 


माडग्याळ ता जत येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यू, कॉलेज माडग्याळ शाळेमध्ये आठवडा बाजार भरवण्यात आला. 
या मुलांच्या आठवडी बाजाराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एस.आय. हिरगोंडे यांच्या हस्ते केले. व शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका , पर्यवेक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आठवडा बाजार उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.आय. हिरगोंडे सर म्हणाले की,  विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळावे व जीवनावश्यक वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळ इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार भरविला होता. गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे हा त्यामगचा उद्देश आहे.  बाजारातून होणारी पैशाची देवाणघेवाण भाजीपाला मालक व ग्राहक यांच्यात होणारा व्यवहाराचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह चेहऱ्यावर दिसत होता. या बाजारामध्ये खाद्य पदार्थपैकी भेळ, वडापाव, पाणीपुरी, सांबर, फरसाणा, केळी, बिस्किट्स, चहा, असे विविध पदार्थ आस्वाद घेण्यासाठी महिला वर्ग पालकांनी गर्दी केली होती. विविध मान्यवरांनी या बाजाराला भेट देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी चे कौतुक केले गेले. 
हा बाजार यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, पर्यवेक्षक, शाळेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top