जनसत्ता न्यूज
लंडन येथील "नॅशनल आर्मी म्युझियम मध्ये हा "बिल्ला" जतन करून ठेवलेला असून, त्याबाबत अशी माहिती लिहून ठेवली आहे की, 'भारतातील महाराष्ट्रातील महार समाजातील सैनिक हे ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मीचा मुख्य आधार होते. हा बिल्ला दुसऱ्या महायुद्धाचा असला तरी, त्यावरिल वैशिष्ट्यीकृत स्तंभ हा १८१८ मध्ये झालेल्या कोरेगावच्या लढाईचे स्मरण व युद्धाचा सन्मान करतो, जेथे महार सैन्याने कंपनीला पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करण्यास मदत केली होती, आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ, ईस्ट इंडिया कंपनीने कोरेगावमध्ये 'विजय स्तंभ' उभा केला."
प्रा. दादासाहेब ढेरे सर