yuva MAharashtra हरोली विकास सोसायटीच्या सभासदांना यावर्षी दहा टक्के लाभांश जाहीर

हरोली विकास सोसायटीच्या सभासदांना यावर्षी दहा टक्के लाभांश जाहीर

Admin
0




सांगली न्यूज


 हरोली विकास संस्थेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  खेळीमेळीत पार पडली. 
संस्थेने यावर्षी सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर केला.
अहवाल वाचन सचिव गुरुप्रसाद  कुलकर्णी यांनी केले.
संस्थेची सभासद संख्या  ४१६  असून एकूण  भागभांडवल - ९९ लाख २ हजार इतके आहे. 
संस्थेने सातत्याने ऑडीट वर्ग-'अ' राखला आहे.
सदर सभेमध्ये संस्थेच्या नवीन इमारत बांधकामाबाबत निर्णय घेणेत आला.
संस्थेचे ऊत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून  नवीन व्यवसाय सुरू करणेबाबत चर्चा करणेत आली.
 ऊस पिकातुन एकरी विक्रमी ऊत्पन्न घेणाऱ्या सभासदांचा संस्थेच्या येणाचा वार्षिक सभेमध्ये सत्कार घेणेबाबत निर्णय झाला, संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा शैक्षणीक क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांचा व विविध शासकीय सेवेत उच्चपदस्थ पदावर निवड होणाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन हनमंत पाटील यांनी केले.
 यावेळी व्हाईस चेअरमन सौ. उर्मिला खराडे , संचालक सर्वश्री सुरेश पाटील, पाटील, श्री. दादासो  पाटील, प्रताप पाटील, बबन बंडगर, बाळकृष्ण कोळी, बाबासो पाटील, बाळासो रायजादे, विश्वास साखरे, सुशांत पाटील, नंदकुमार बनसोडे, श्रीमती मंगल शेंडे, अरुण पाटील, श्री. संजय  पाटील, सुनिल पाटील, संजय जाधव, पोपट पाटील, आर डी पाटिल, रावसाहेब पवार, सुनील पटिल सदस्य उपस्थित होते आभार संजय पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top