सांगली न्यूज
*माझी निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे कार्यकर्त्यांनी तयारीला लागा: डॉ.शंकर माने*
बोरगाव: बोरगाव व सावर्डे येथे बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ.शंकरदादा माने हे बोलत होते भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या मतदारसंघांमध्ये बहुजनांची संख्या 80 टक्के असून सुद्धा आज पर्यंत बहुजन समाजाला राजकीय हिस्सेदारी मिळाली नाही ते मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आज बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश नक्कीच येईल आणि आत्ता ती वेळ आली आहे या प्रस्थापित राजकारण्यांना जनता कंटाळली आहे म्हणून गोरगरिबातील नेतृत्व आता जनता मान्य करेल या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत गरीब मराठा समाजातील, ओबीसी, एससी, एसटी, समाजातील लोकांचा निवडणुकीपुरता वापर करून घेतला आहे. आता मी तो गैरवापर होऊ देणार नाही येणारी तासगाव-कवठेमहांकाळ मतदार क्षेत्रातील निवडणूक लढणे माझं फिक्स आहे कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असे वक्तव्य डॉ.शंकर माने यांनी केले एका दिवशी सावर्डे व बोरगाव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं जनसामान्याकडून प्रतिसाद चांगला होता हे उद्घाटन तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघाचे येणारे आमदार मा.डॉ.शंकरदादा माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उज्वला धोतरे, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष संतोष कुमार वानखडे, आटपाडी खानापूर विधानसभा प्रभारी अजित खंदारे, सविता कांबळे, उत्तम नाईक, सिताराम माने, राम माने, विजय माने, प्रशांत माने, सिद्धनाथ माने, अमोल वाघमारे, संतोष पवार, स्वप्नाली सरोदे, सुषमा लोंढे, दशरथ घोडके, सोनू माने आधी गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते