सांगली न्यूज / कवठेमहांकाळ
वेदांत उद्योग समूहाचे*
"*स्वप्नपूर्ती मल्टिपरपज हॉल*"
यांच्याकडून
"*स्वप्नपूर्तीचा वचनपूर्ती सोहळा*"
25 सप्टेंबर रोजी पार पडला होता.....
स्वप्नपूर्ती हॉल च्या संस्थापकांनी जसा शब्द दिला होता ऑगस्ट 2024 चं येणारं सर्व हॉल चं भाडे आम्ही जिल्हा परिषद शाळा बोरगांव च्या विकास कामांसाठी वापरणार,
तश्या पद्धतीने त्यांनी आलेल्या भाड्यामध्ये अजून पैसे घालून शाळेसाठी
एक "CCCTV कॅमेरा सेट"
भेट म्हणून दिला होता,
काही कारणास्थव ते जोडण्यास थोडा काळ गेला,
पण शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कोरे सर व गावचे कार्यक्षम सरपंच सन्मानीय नामदेव पाटील साहेब यांच्या सहकार्यातून काल म्हणजेच 19 ऑक्टोबर 2024 रोजी ते कॅमेरे जोडून ती प्रणाली सुरु करण्याचे काम संपन्न झाले,
यातून हे स्पष्ट दिसत आहे स्वप्नपूर्तीची वचनपूर्तीची आता कार्यपूर्ती सुद्धा होताना दिसत आहे.....
या camera system चा फायदा अनेक विध्यार्थी आणि विध्यार्थिनींना तर होणारच आहे पण याचा महत्वाचा फायदा या सर्वांच्या पालकांना होणारे,
कारण, आपला विध्यार्थी शाळेत काय आणि कसा करतो ते त्यांना स्पष्ट त्यांच्या स्वतःच्या मोबाईल वर दिसण्याची सोय गावचे कार्यतत्पर सरपंच लवकरच करणारेत,
त्यामुळे वेदांत उद्योग समूहाच्या यशा मधे हा एक मानाचा तुरा रोवला गेला असही म्हणता येईल....
त्यानिमित्ताने बोरगांव गावचे सरपंच ,उपसरपंच सुजित पाटील दादा व सर्व सदस्य ,
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,
गावातील सर्व ग्रामस्थ व सर्व पक्ष्याचे पदाधिकारी यांचे अभिनंदन व आमच्या परिवाराकडून आपणा सर्वांस दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,
ही दिवाळी आपणास आनंदाची भरभराटीची आरोग्यदायी व सुख समृद्धीची जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!!!!