कर्तव्य निष्ठ व कर्तव्य पूर्ती करणारे अधिकारी असल्यास आम्हा ग्रामरोजगार सेवकांना प्रशासनात काम करणे सोपे जाते,अधिकारी यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांची उकल होण्यास साहाय्य झाले,असे उदगार ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष तानाजी शिंगाडे यांनी काढले.
मग्रारोहयो अंतर्गत good Govern ance अंतर्गत १ ते ७ नमुने यांची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी टिपीओ,सिडीओ, आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रशिक्षणावेळी माहिती मिळाले वरुन
कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांची बदली पंचायत समिती धारणी जिल्हा अमरावती येथे झाल्याने कवठेमहांकाळ पंचायत समिती मध्ये उपस्थित रोहयो विभागातील अधिकारी, कर्मचारी,व ग्रामरोजगार सेवक यांच्यावतीने प्रशिक्षण दरम्यान पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला, त्याप्रसंगी अध्यक्ष बोलत होते.
प्रशासनातील जाण,कर्तव्य करणाऱ्या अधिकारी यांची नेहमीच आठवण येईल असे जिल्हाअध्यक्ष शिवाजी हक्के यांनी सांगितले.
वेगवेगळ्या स्थरावर तीन वर्षे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे आपण काम केले असून सर्वांनीच प्रेम व सहकार्य केले आहे,असे भावपूर्ण मनोगत गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी व्यक्त केले.कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने,लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने आपण तालुक्यातील जनतेचे प्रस्ताव जास्ती जास्त मंजूर करून कामे पूर्ण करुन सोडविण्याचाही प्रयत्न केला आहे, ते प्रशिक्षणा दरम्यान बोलत होते.
कवठेमहांकाळ तालुक्याची आठवण नेहमीच राहील असे भावपूर्ण उदगार गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी काढले.
यावेळी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रशांत जेऊरकर,एसडीओ भीमाजी कुलकर्णी, तांत्रिक अधिकारी सुरज सूर्यवंशी, तांत्रिक अधिकारी अनिल भोसले, तांत्रिक अधिकारी किरण माळी, जिल्हाध्यक्ष शिवाजी हाके यांच्यासह कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक,व सूत्रसंचालन प्रशांत जेऊरकर यांनी केले, शेवटी आभार तांत्रिक अधिकारी सुरज सूर्यवंशी यांनी मानले.
दबंग व धाडसी अधिकारी यांच्या मुळे जनतेची कामे होतात - तालुका अध्यक्ष तानाजी शिंगाडे
September 28, 2024
0
Share to other apps