सांगली न्यूज
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चँरिटेबल फाँउडेशनच्या वतीने देशिंग येथे आयोजित रक्तदान शिबिरात १३६ रक्त दात्यानी सहभाग नोदंवला पुरुषाबरोबर महिला ही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
शिबिराचे उद्घाटन श्री अरविंद मोरे (प्रचारक मुंबई) श्री जालिदंर जाधव ( संयोजक ,सांगली), देशिंग गावचे सरपंच
श्री प्रवीण पवार ,सोसायटी चेअरमन श्री प्रकाश वावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. यावेळी श्री अरविंद मोरे जी म्हणाले की निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणीमुळे मानव कल्याणाचे सुरू असलेले सेवा कार्य प्रेरणादायी असून मिशनमुळे तरुण मुले चांगल्या सन्मार्गाला लागलेली आहेत, ही मंडळाची सामाजिक बांधिलकी म्हणावी लागेल .तसेच स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण व मोफत नेत्र तपासणी शिबिरे आदी उपक्रम राबवून "मानव सेवा हिच ईश्वर सेवा,"या सदगुरूच्या शिकवणी नुसार कार्य करीत आहेत .
शिबिरा दरम्यान सौ.सुरेखा कोळेकर (माजी सभापती पंचायत समिती कवठेमंकाळ ) रक्तदान शिबिरास भेट देऊन या कार्यक्रमाचे कौतुक केले. या निरंकारी मिशनच्या शिकवणीची आजच्या समयाला गरज आहे असे उदगार त्यांनी काढले. रक्त संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ब्लड बँक मिरजच्या डॉ. रसिका सावंत व पदमभूषण वसंतदादा पाटील ब्लड बँक सांगली चे डॉ. निलेश पाटील यांनी केले. सायंकाळी ६:३०ते ९:०० या वेळेत विशेष सत्संग सोहळा आयोजित केला होता. दोन्ही कार्यक्रमांसाठी देशिगं परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------
-