yuva MAharashtra राहुल द्रविड काय अजब माणूस आहे !

राहुल द्रविड काय अजब माणूस आहे !

Admin
0



       सांगली न्यूज 

वर्ल्डकप जिंकल्यानंतर द्रविडला BCCI ने 5 कोटी देऊ केले तर हा म्हणाला बाकीचे तीन कोच जितकं मानधन घेत आहेत, तेवढंच मी घेईन कारण आम्हा सगळ्यांचं समान योगदान आहे. असं म्हणत त्याने अडीच कोटी नाकारले !
असं वागण्याची राहुलची ही पहिली वेळ नाही पूर्वी अंडर १९ वर्ल्डकपच्या वेळीही त्याने बोनस रक्कम नाकारली होती.
मागे बंगलोरच्या विद्यापीठाने त्याला मानद डॉक्टरेट दिली होती तेव्हा राहुलने ती नम्रपणे नाकारताना म्हटलं होतं मला माहितीय किती कष्ट घेतल्यानंतर ही पदवी मिळते ते. मी कधी वाटलं तर संशोधन करून पदवी मिळवेन; पण आयती पदवी नको !
विजयानंतर मोदींनी संपूर्ण टीमसोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न केला त्यात बोलताना राहुल म्हणाला, "सर्वांचं योगदान यात महत्वाचं आहे. मोहम्मद सिराज तीनच सामने खेळू शकला. इतर तीन राखीव खेळाडूंना एकही मॅच खेळता आली नाही मात्र ते नाराज झाले नाहीत त्यांनी टीमचा उत्साह वाढवला." राखीव खेळाडूंचाही इतका मनापासून केलेला उल्लेख आवडला. त्यामुळे रोहित शर्मा म्हणाला ते खरं आहे. द्रविडमुळे टीम घट्ट बांधली गेली. असा बॉण्ड तयार झाला की मग विराट कोहलीसुद्धा (मोदींना) सांगू लागतो की मला वाटायचं की मी एकटाच सगळं काही करतोय, असा माझ्यात अहंकार तयार झाला होता. अहंकार आला की खेळ तुमच्यापासून दूर जातो. मी अहंकार दूर करायचा प्रयत्न केला आणि मी खेळू शकलो. किती सुंदर साक्षात्कार आहे हा !
ग्राउंडवर चौकार, षटकार माराल कितीही पण ग्राउंडच्या बाहेरची ही मूलभूत गोष्ट राहुल द्रविडने या टीमला दिली. तो प्रशिक्षक म्हणूनही निवृत्त होतो आहे. या आताच्या क्रिकेट टीमला त्यानं प्रशिक्षित केलं आहे; पण आता तो नसेल तेव्हा परिस्थिती अधिक 'गंभीर' असेल. असो. राहुलने क्रिकेट टीमइतकंच तुम्हाला, आम्हालाही शिकवलं आहे. खेळाडू म्हणून तो आवडत होताच. माणूस म्हणून तो अधिक आवडू लागला आहे. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top