सांगली न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी या गावातून खडतर परिस्थितीवर मात करण्यासाठी आई-वडिल दुष्काळी भागातून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी कोकणासारख्या नवीन जागी व्यापाराला गेले काही वर्ष व्यापार करत असताना काही कार्यक्रमानिमित्त आपल्या गावाशी येत असताना अचानक त्यांच्यावर काळात घाव घातला व आई व वडील, व आईचे वडील तिघेही एकाच वेळी देवाला प्रिय झाले जे म्हणतात ना जे आवडे सर्वांना तेच आवडे देवाला अशी तिन्ही माणसे एकाच दिवशी देवाला तयारी झाली आणि या सर्वांना पोरके करून निघून गेले पाठीमागे असलेली चार पोर त्यातील एक बहीण लग्न झालेलं होतं ती नात्यातच म्हणजे मामाला दिली होती राहिलेल्या तीन भावंडांना आजी आजोबा मामा बहिणीने चुलत्याने मावश्यांनी काकांनी आत्यांनी आत्यांनी सर्वांनी खंबीर साथ दिली मामा नी आयुष्यात योग्य दिशा दाखवली व खंबीर साथ त्याचे सार्थक ऋतिक दुधाळ यांनी नगर परिषदेमध्ये ज्युनिअर इंजिनिअर (जे इ) पद मिळवून आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने व सर्व नातेवाईकांच्या साथीने हे शक्य करून दाखवलं