yuva MAharashtra कवठे महांकाळ मधील शेकडो तरुणाचा मनसेमध्ये प्रवेश

कवठे महांकाळ मधील शेकडो तरुणाचा मनसेमध्ये प्रवेश

Admin
0



सांगली न्यूज 

कवठे महांकाळ : सांगली जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी सांगली येथील हॉटेल द ग्रेट मराठा येथे मनसे नेते अविनाश अभ्यंकर आणि सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी राज्यातील लोकप्रतिनिधींच्या संधीसाधू राजकारणाला कंटाळून आणि मराठी हृदय सम्राट राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन कवठे महांकाळ तालुक्यातील शेकडो तरुणांनी मनसेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
      यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी मत व्यक्त करताना,निष्ठावंत मनसैनिक हीच खरी मनसेची ताकद असून तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम करा.वीज,पाणी,रस्ते,शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा नागरिकांना मिळवून देण्यासाठी लढा.गोरगरीब जनतेचा खरा वाली,त्याच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लढणारा तसेच तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणारा पक्ष अशी मनसेची ओळख निर्माण करा असा सल्ला उपस्थित तरुणांना दिला. 
        याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कुलकर्णी,टेलिकॉम सेनेचे जिल्हा संघटक संग्राम पाटणकर,तालुका अध्यक्ष कुमार जाधव,तालुका उपाध्यक्ष आदिकराव पोळ,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष आकाश तेली,तालुका उपाध्यक्ष महेश साबळे,रोहित माळी,जितेंद्र मंडले,जनार्दन सोनकर,प्रशांत सदामते,ऋतिक सदामते,पृथ्वीराज पाटील,रोहन हजारे,विनायक चव्हाण,पवन करे,वरून राजेशिर्के,प्रथमेश चंदनशिवे तसेच इतर तरुण,मनसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top