yuva MAharashtra कवठेमहांकाळ परीट समाजाचा मेळावा संपन्न .

कवठेमहांकाळ परीट समाजाचा मेळावा संपन्न .

Admin
0



सांगली न्यूज 

आज शनिवार दि 10/2/204 रोजी कवठेमहांकाळ येथे संत गाडगे बाबा परीट समाज मंदिर मध्ये परीट समाजाचा मेळावा घेण्यात आला व कवठेमहांकाळ परीट समाजाची  कार्यकारणी  निवड करण्यात आली . सदर कार्यक्रम  *महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ सांगली जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंखे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अनिल नाना साळुंखे, माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष शर्मिलाताई शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष रंजना ताई जाधव  जिल्हा सचिव विजय खेडकर लॉन्ड्री संघटनेचे अध्यक्ष अशोक आप्पा साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश निकम, जिल्हा युवा अध्यक्ष रोहन परीट हे प्रमुख उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचा हस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन  व दीप  प्रज्वल करून करण्यात आली .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष विशाल रसाळ यांनी केले, स्वागत व प्रास्ताविक  शहर उपाध्यक्ष गणेश राक्षे यांनी केले .
*मनोगत श्री मनोहर साळुंखे, श्री अनिल नाना साळुंखे , श्री अशोकराव शिंदे , सौःशर्मिलाताई शिंदे  श्री विजयराव रसाळ,  अध्यक्षीय भाषण श्री संजय भाऊ साळुंखे यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे आभार तालुका सचिव श्रीकांत भंडारे यांनी मानले . या कार्यक्रमाला उपस्थित महादेव रसाळ बाळासाहेब गायकवाड सुरेश रसाळ रामभाऊ गायकवाड उमेश रक्षे दत्तात्रेय रसाळ रोहित परीट अभिजीत हजारे, शितल रसाळ, सागर ननवरे राजेंद्र शिंदे, राजवर्धन रसाळ, अनिल शिंदे,लता गायकवाड, जयश्री वाघमोडे, सुधा रसाळ, वैशाली राक्षे,माया रसाळ, संगीता रसाळ, पल्लवी भंडारे, नम्रता रसाळ,अश्विनी हजारे, पूजा गायकवाड, सुनिता शिंदे यावेळी समाज बांधव व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 🙏

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top