सांगली न्यूज डिजिटल
केंद्र सरकारच्या वतीने डिसेंबर २०२३ मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एनएमएमएस या स्पर्धा परीक्षेत सर्वोदय हायस्कूल घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून,याकामी त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सदर परिक्षेसाठी या शाळेचे एकुण २७ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी २३ विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्या मध्ये प्रतिक देवकर,ऋषीकेश कुंभार,प्रिया शिंदे,प्रियाल काळे,सुरज गोरे,कार्तिक शिंदे,श्रुतिका जाधव,श्रेया शिंदे,पियुष गोरे,श्रेया जाधव,हर्षदा जाधव,वैष्णवी जाधव,कुणाल जाधव,साहेबराव जाधव,नंदिनी सुतार,दिग्विजय शिंदे,मौसम देवकुळे,कृतिका मलमे,आर्यन शिंदे,नैतिक कांबळे, स्वाती शिंदे,सिध्दी शिंदे व श्रावणी शिंदे यांचा समावेश आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बी एस शिंदे,स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख भरत काळे व दिलीप खाडेसह शिक्षक,पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
घाटनांद्रे सर्वोदय हायस्कूलचे एनएमएमएस परिक्षेत घवघवीत यश
February 11, 2024
0
Share to other apps