yuva MAharashtra छ. शिवाजी महाराजांचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर नको: प्रा. हरिप्रसाद पवार

छ. शिवाजी महाराजांचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर नको: प्रा. हरिप्रसाद पवार

Admin
0




सांगली न्यूज डिजिटल 

पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, कवठे महांकाळ येथे दिनांक २०/०२/२०२४ रोजी इंग्रजी विभाग, इतिहास विभाग, आणि एन.एस.एस. विभाग यांच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रा. हरिप्रसाद पवार यांचे 'शिवाजी महाराज आणि त्यांचा वर्तमानकालीन संदर्भ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलत असताना प्रा. हरिप्रसाद यांनी शिवरायांचे धर्मनिरपेक्ष धोरण, शिवकालीन आणि वर्तमानातील राजकीय धोरण याचा तौलनिक अभ्यासाचे प्रदीर्घ क्षेत्र आणि शेकडो वर्षांपासून मराठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यातील पेशवेदफ्तर आणि तंजावर मधील सरस्वती महाल ग्रंथालय येथील ऐतिहासिक कागदपत्रांचा दुर्लक्षित इतिहास या विषयावर सविस्तर मते मांडली. आजच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी करू नये असेही मत प्रा. हरिप्रसाद पवार यांनी मांडले. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सृतिदिनानिम्मित्त 'शिवाजी कोण होता'? या पुस्तकाच्या १०० प्रतीचे वितरण करण्यात आले. त्याच बरोबर समाजासाठी वाचन या अनुभवात्मक शिक्षण पद्धतीचा उदघाटन सोहळाही पार पडला. अनुभवात्मक शिक्षण पद्धती मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील लोकांसाठी पुस्तकाचे अभिवाचन करण्याचे आवाहन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेंद्रनाथ बाबर यांनी केले. या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभाग प्रमुख एस. एस. कांबळे, इतिहास विभाग प्रमुख एस. एन. पोळ, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी एन. एस. पोळ, रसायनशास्त्र विभाग प्रमुख एस. व्ही. पाटील, सोनंद सर, बी. टी. चंदनशिवे सर, सागर एडके, श्रीकांत फाकडे, निशिकांत वाघमारे, सचिन गडहिरे, अमर पवार, राधाकृष्ण सुतार, डॉ. सरस्वती आंदेलवार आणि इतर सर्व प्राद्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सुदर्शन शिंदे आणि प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top