सांगली न्यूज डिजिटल
मुंबई येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीदरम्यान बहुजन समाज पार्टीचे कदावर नेते व युवक आणि कामगार नेते म्हणून ओळखले जाणारे डॉ.शंकर माने यांची बसपाचे राज्यसभेचे खासदार रामजी गौतम आणि महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नितीन सिंग तसेच प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे व पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी हुलगेश चलवादी व काळूराम चौधरी यांनी बहुजन समाज पार्टी सांगलीची यापूर्वीची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये बीएसपी भवन चेंबूर मुंबई येथे डॉ शंकर माने यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करून सत्कार करण्यात आला यावेळी पार्टीच्या प्रोटोकॉल प्रमाणे लोकसभा उमेदवार शोधून त्याला तिकीट देऊन पार्टीचा महाराष्ट्रातील पहिला खासदार निवडून आणण्यासाठी ही निवड करण्यात आलेले आहे असे प्रदेशाध्यक्ष गोणारे यांनी सांगितले निवडीनंतर
पत्रकारांशी बोलताना डॉ. शंकर माने यांनी सांगितले की सांगली लोकसभेचा खासदार हा बहुजन समाजातील व बहुजन समाज पार्टीचा असेल कारण 85 टक्के बहुजन समाजाला आज सुद्धा संघर्ष फक्त आरक्षणासाठी व भाकरी साठी करावा लागतो आहे तो थांबवण्यासाठी आपल्याला नुसतं काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी, सेनेच्या खासदार निवडून आणून आपली समस्या सुटणार नाही तर तो बहुजन समाजाचा खासदार असला पाहिजे आणि तो बहुजन समाज पार्टीचा असला पाहिजे कारण त्याला आपल्या मतदारसंघाबद्दल खुलेआम बोलता येईल शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, नरवीर उमाजी नाईक,आदरणीय कांशीराम यांच्या विचारधारेचा खासदार आम्ही निवडून आणत नाही तोपर्यंत आमच्या बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही आणि तो न्याय मिळवून देण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये सांगली लोकसभेमध्ये आम्ही बहुजन समाजातील खासदार लोकसभेमध्ये निवडून आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवणार आहोत आणि मी सर्व पदाधिकाऱ्यांचा तसेच बहनजी मायावती यांचा आभारी आहे त्यांनी मला जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली मी त्यांच्या निवडीला साध्य ठरवून बहुजन समाज पार्टीचा कारवा पुढे घेऊन जाण्याचे काम करीन