yuva MAharashtra कवठेमहांकाळ येथे 14 वे चारुतासागर साहित्य संमेलन संपन्न

कवठेमहांकाळ येथे 14 वे चारुतासागर साहित्य संमेलन संपन्न

Admin
0



सांगली न्यूज डिजिटल 

चारुतासागर यांच्या कथा लेखनात सामन्या बरोबर उपेक्षितांच

वास्तव जीवन असल्याने कथा दर्जेदार

  ----- जेष्ठ लेखक आप्पासाहेब खोत 


प्रतिभा पोरे यांना राज्यस्तरीय चारुतासागर कथा पुरस्कार ;



कवठेमहांकाळ :  यांच्या कथा लेखनात सामन्या बरोबर समाजातील उपेक्षितांचे 

वास्तव जीवन कथेत असल्याने कथा 

अधिक दर्जेदार व वाचनीय असल्याने आजही सागरांच्या कथा वाचक अस्तेने व अपुल वाचतात हे चारुतासागर यांच्या कथेचे खरे वैशिष्ट्यपूर्ण आसल्याने 

प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आप्पासाहेब खोत यांनी कवठेमहांकाळ येथे संपन्न झालेल्या 14 व्या चारुतासागर साहित्य संमेलना प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळेस चारुतासागर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ धन्वंतरी डाॅ.जे.डी.म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे स्वागत वैभव गुरव यांनी केले तर प्रास्ताविक चारुतासागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.आबासाहेब शिंदे यांनी केले.यावेळेस प्रतिभा पोरे यांना राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून जेष्ठ लेखक प्रा.यशवंत माळी यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्या निमित्तांने सपत्नीक सत्कार करण्यात आला असून 


कवठेमहांकाळ तालुक्यात सर्व पत्रकारांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळेस उद्घाटनपर भाषणात डाॅ.जे.डी.म्हेत्रे म्हणाले की आजच्या 

युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता 

वाचन,लेखनाचा छंद जोपासावा, लेखकांच्या जीवनातील अनुभव आपणास प्रेरणा देतात आणि नवीन लेखन करण्यास नवे बळ निर्माण करुन देतात.यावेळेस प्रा.राजाराम पाटील म्हणाले की चारुतासागर यांच्या साहित्याने साहित्य चळवळीस नव लेखनास नवी दिशा प्राप्त झाली असून चारुतासागर साहित्य चळवळीने त्यांना प्रेरणास्थान मानूनच लेखन केले आहे.यावेळेस अँड अजित पुरोहित म्हणाले की आम्ही चारुतासागर प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय चारुतासागर कथा स्पर्धा घेतो तेव्हा महाराष्ट्रातून तब्बल 50 हून अधिक कथा येतात त्यातील उत्कृष्ट उल्लेखनीय कसदार कथेला चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्कार देऊन सन्मानित करतो यावर्षी सांगलीच्या प्रतिभा पोरे यांनी जिद्द कथेचा प्रथम क्रमांक आला आहे.

  

 चारुतासागर साहित्य संमेलना प्रसंगी लेखक आप्पासाहेब खोत पुढे म्हणाले की चारुतासागर यांच्या कथा वाचकाला आज ही भुरळ घालतात.त्याचबरोबर सागरांच्या कथा वाचकांच्या मनाला अस्वस्थ करून सोडतात.याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या सर्वच कथा ह्या ग्रामीण भागातील सामान्य माणसांचे वास्तव जीवन अचूक टिपून कथेत जसेच्या तसे सागरांनी उतरल्याने प्रतेक कथा ही कसरत व दमदार झाल्याने ती कथा अधिक प्रभावित झाली आणि वाचकांच्या अभिरुचीस उतरले.ह्या कथा साहित्याची प्रेरणा घेऊन नव्या लिहीत्या लेखकांनी चारुतासागर यांची साहित्य परंपरा पुढे चालू ठेवावी असे प्रतिपादन ही श्री खोत यांनी संमेलना प्रसंगी केले.


संमेलना प्रसंगी आप्पासाहेब खोत यांनी कोंबडी कथा सांगून श्रोत्यांची मने जिंकली.रसिकांनी ही टाळ्या आठवून भरभरून दाद दिली.तर किशोर दिपंकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पारपडले या कविसंमेलना सौ.भारती खोत, शिवाजी बंडगर,प्रा यशवंत माळी,प्रा.डाॅ.आबासाहेब शिंदे,मोहन खोत, स्वाती कोरे, सुरेखाताई कांबळे, रंजना शेळके,फेरोजा मुल्ला,सौ.मंदाकिनी सपकाळ,प्रतिभा पोरे,दत्तात्रय सपकाळ, दत्ताजीराव शिंदे, सुरेश पाटील इत्यादींने काव्या वाचन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेखा कांबळे यांनी केले तर आभार मोहन खोत यांनी माणले.

--------------------------------------------------

फोटो ओळी:-- कवठेमहांकाळ येथे 14 व्या चारुतासागर साहित्य संमेलना प्रसंगी जेष्ठ लेखक प्रा.यशवंत माळी यांचा सहपत्निक अमृतमहोत्सव सत्कार व प्रतिभा पोरे यांना राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करताना जेष्ठ लेखक आप्पासाहेब खोत, प्रा.डाॅ.आबासाहेब शिंदे,प्रा.राजाराम पाटील, अँड अजित पुरोहित, डाॅ.जे.डी म्हेत्रे, राजेंद्र भोसले इत्यादींसह प्रमुख उपस्थितीत होते.

 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top